जुळले प्रेमाचे नाते - भाग-५८

(24)
  • 9.4k
  • 1
  • 4.3k

निशांतच्या अचानक बोलल्याने आम्हचे हसरे चेहरे अगदी गंभीर झाले. बाबांनी ते पत्र आणायला लावले. मी तर नाखुशीने ते पत्र घेऊन आले..बाबांनी ते पत्र हातात घेतलं. आणि वाचायला सुरुवात केली...प्रिय जानु...,"कशी आहेस. छानच असशील म्हणा.. मी बघतो ना तुला रोज.. कसा.., कधी..! नको हा विचारुस..!!. आणि आता तर तु एकवीस वर्षाची झालीस.. तुझा वाढदिवस झाला. बघ ना मला काही यायला जमल नाही म्हणुन तुझ्यासाठी गिफ्ट्स पाठवले. आवडले ना ग तुला..???"आणि हो तु मला विसरली असशील पण मी नाही तुला विसरलो. ते क्षण कधीच नाही विसरू शकत. येतोय मी लवकरच तुला भेटायला.. तुला माझी बनवायला. तुला कायमच स्वतःचं बनवायला... मी येतोय. भेटु