जुळले प्रेमाचे नाते - भाग-५७

(20)
  • 9.6k
  • 1
  • 4.2k

तो दिवस मात्र निशांत सोबत छान गेला.. त्या दिवसाच्या बरोबर दोन दिवसांनी मी हॉलमध्ये बुक वाचत बसले असता दरवाजावरील बेल वाजली. मी जाऊन उघडले तर समोर एक कुरिअर वाला मुलगा हातात एक मोठं कुरिअर घेऊन उभा होता.."मिस प्रांजल प्रधान..??" त्याने माझ्याकडे बघत विचारले."येस.. मीच आहे. बोला." मी ही त्याच्याकडे बघत बोलले."मॅडम तुमचं पार्सल आलं आहे. हे घ्या आणि इथे सही करा." एवढं बोलून त्याने ते भल मोठं पार्सल माझ्यासमोर ठेवलं आणि पाठीमागच्या बॅगमधुन अजून एक पार्सल कडुन माझ्या हातात ठेवलं. "हे अजुम एक आहे घ्या. आणि इथे सही करा." एवढं बोलून त्याने सही घेतली आणि तो निघून गेला. मी त्या भल्यामोठ्या पार्सलकडे