जुळले प्रेमाचे नाते - भाग-५६

(21)
  • 8.6k
  • 1
  • 4.1k

"अग आई...! हे काय कोणी पाठवले एवढे बुके..??? बाबांना प्रमोशन मिळालं की काय ग ???" मी आनंदाने धावत रूमधून बाहेर आले आणि आई ला विचारले.."नाही ग बाळा. बाबांना प्रमोशन वैगेरे काही नाही मिळालं..आई हे बाबांसाठी नाही तर हे सगळे बुके तुझ्यासाठी आहेत. त्यावरच्या सगळ्या ग्रीटिंगकार्ड वर तुझं नाव आहे प्राजु.." आईने जरा हसुन सगळं सांगितलं. मग मी ही धावत जाऊन सगळे ग्रीटिंगकार्ड बघायला सुरुवात केली पण जे मला हवं ते मात्र मला त्यावर दिसलं नाही..."अग आई हे निशांतने नाही पाठवलेत...?!!!" माझ्या या वाक्यावर आई मात्र उडालीच..."अग मला वाटलं तुझ्यासाठी निशांतने पाठवले असतील... पण तुला कस कळलं की हे निशांतने नाही