जुळले प्रेमाचे नाते - भाग-५२

(22)
  • 9k
  • 2
  • 4.4k

अलार्म वाजत होता आणि मी तो बंद करून करून झोपत होते.. शेवटी तो मोबाईल ही कंटाळला आणि बंद झाला... मग मी ही जास्त वेळ न लोळता उठुन बसले.. आणि मला आठवल की काल रात्री तर रिया बाजुला होती.. पण आता ती नव्हतीच तिथे. पण बाहेरून हसण्याचे आवाज मात्र येत होते..मग मी उठुन फ्रेश झाले आणि बाहेर आले. समोर सोफ्यावर निशांत, आजोबा, रिया आणि बाबा बसले होते आणि त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. मी माझ्या रूमधुन सरळ तिथे गेले... "काय कसल्या एवढया गप्पा चालू आहेत." मी सोफ्याजवळ जात विचारल."काही नाही ग आमच्या अशाच गप्पा चालू होत्या.." रिया निशांतला टाळी देत बोलली. "अच्छा." मी