जुळले प्रेमाचे नाते - भाग-५१

(13)
  • 12.2k
  • 1
  • 4.5k

"सॉरी ना... माफ कर. परत असा गैरसमज करून नाही घेणार. पक्कावाला प्रॉमिस.." मी स्वतःचे कान धरून माफी मागितली तेव्हा कुठे त्याने स्वतःचा राग सोडला.. मग थोडं बोलून आम्ही बाहेर आलो... चहा-नाश्ता करून निशांतला एअरपोर्ट वर जायचं होतं तिला घ्यायला.. खरतर सोबत मी ही जाणार होते.. पण निशांतच्या घरी जायचं होतं पण आजोबांचं नको बोलले आणि रियाला इकडे घेऊन यायच त्यांनीच ठरवल. त्यामुळे निशांत तिला घ्यायला गेलेला.. मी आणि बाबा ज्वेलरीच्या दुकानात गेलो.. कारण आजी-आजोबांनी माझ्यासाठी सोन्याच ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिल होत मग आम्ही ही निशांतला सेम ब्रेसलेट घेणार होतो.. मी आणि बाबांनी मिळून छान अस सिम्पल पण त्याला आवडेल अस ब्रेसलेट घेतलं