डायनिंग टेबलवर आम्ही सगळं छान ठेवलं होतं.. डाळ, भात, बटाटा भाजी.., श्रीखंड-पुरी.., अळुवड्या.., पापड-लोणचं आणि बाबांचे आवडते गुलाबजामुन.. अस साधं पण सर्वांना आवडेल अस जेवण होत..डायनिंग टेबलवर समोर बाबा तर बाबांच्या बाजुला आजोबा.. आजोबांच्या समोर आजी.. आजीच्या बाजूला मी आणि माझ्यासमोर निशांत.. आणि बाबांच्या समोर आई.असे सगळे आम्ही बसलो होतो."घ्या सगळ्यांनी पोटभर जेवा हा..." आईने सर्वांना सांगितलं. तस मी ताटातील श्रीखंड पुरीवर ताव मारला.. समोर निशांत होताच.. ज्याची नजर फक्त माझ्यावर होती.., पण मी काही त्याच्याकडे बघत नव्हते.. "का बघु मी...?? मी असताना कोणी दुसरं त्याला ओवाळावे.. मी कस सहन करू ना.." हे सगळं मी माझ्या मनात बोलत होते आणि एक