जुळले प्रेमाचे नाते - भाग-४९

(17)
  • 10.2k
  • 1
  • 4.4k

"अग छडी नाही.. फटाके आणले आहेस ना..." मागून निशांत हातात भल्यामोठ्या ब्यागा घेऊन येत बोलला. तिकडच्या काकांनी त्याला मदत केली आणि आम्ही सगळे आत आलो. "दिवाळीच्या शुभेच्छा आसावरी मॅडम.. कशा आहात तुम्ही..??" मी त्यांना मिठी मारत विचारलं. "मी छान आहे.. तु कशी आहेस आणि तुला ही दिवाळीच्या शुभेच्छा.." मिठी घट्ट करत त्यांनी ही शुभेच्छा दिल्या."कशी आहे आता तब्बेत प्रांजल..?? निशांतकडुन कळलं तुझं ऍकसिडे झालेल. आता तब्बेत ठीक आहे ना.???" त्यांनी काळजीने विचारलं.. "अहो मी एकदम ठणठणीत आहे. हा निशांत काही ही सांगतो.. माझं कुठे ऍकसिडे होतंय.. त्या बिचाऱ्या ट्रकच झालं ऍकसिडे.." माझ्या या वाक्यावर तर त्या जोरात हसल्याच..."काय ग हे... किती हसवशील..! चला म्हणजे