आईच्या गोड आवाजाने माझी सकाळी झाली.... किलकिले डोळे उघडवत मी उठले.. आज दिवाळीचा पहिला दिवस होता.. "धनत्रयोदशी"... फ्रेश होऊन मी बाहेर आले.. बाबांना तर चक्क पाच दिवस सुट्टीचे मिळाली होती.. म्हणजे यावर्षीची दिवाळी छान होणार होती. सोबत अजून एक गोड गोष्ट म्हणजे निशांत येणार होता... वाह...!! अजून काय पाहिजे माणसाला... "गुड मॉर्निंग बाबा..." मी टेबलावर बसत बोलले. त्यांनी ही मला हसत विश केलं. "अग ऐकतेस का ग...! दिवाळी आहे तर निशांत आणि आई-बाबांना ही बोलवू असा माझा विचार आहे.." बाबा न्युजपेपर बाजुला करत आईला विचारत होते. "हो चालेल मी पण आता तेच सांगणार होते..." हात पुसत आई किचनमधून बाहेर येत बोलली. यासर्वात सर्वांत जास्त आनंद होत