एडिक्शन - 18

  • 5.9k
  • 1
  • 3k

जे काम मी करू शकलो नव्हतो तेच काम करण्यास नशिबाने साथ दिली आणि ती माझ्या घरी आलीच ..ती आल्यानंतर लगेच कोर्टात अर्ज दिला आणि एका महिन्याने दोघांनी लग्न देखील केलं ..तिने निर्णय जरी घेतला असला तरी ते निभावणं तिला इतकं सोपं कधीच जाणार नव्हतं ..तिला घरी आणलं आणि हक्काचं स्थान दिल ..आमच्या नात्याबद्दल फक्त आम्हा दोघांनाच माहिती होत ..काही दिवसात घरच्यांना सांगणं भाग होत पण त्याआधी श्रेयसीला सांभाळणं फार गरजेच होत ..मला जमेल तशी तिची काळजी घेऊ लागलो पण तिला ड्रग्सची सवय झाली असल्याने तिला राहणं अशक्य होऊ लागलं होतं ..मी रात्री तिच्या सोबत असायचो पण दिवसभर ती