निघाले सासुरा - 16 - अंतिम भाग

(21)
  • 7.5k
  • 1
  • 3k

१६) निघाले सासुरा! छायाचे लग्न उत्साहात पार पडले. भोजनकक्षात चाललेली गडबड पाहून दामोदर म्हणाले, अरेरे! काय ही गर्दी, म्हणे बफे! हे असे लोटालोटी करून, फतकल मारून खाण्यापेक्षा आणि ताटासाठी एक अधिकची खुर्ची अडवण्यापेक्षा पंगती वाढणे, पंगतीत मानाने बसून खाणे शतपटीने चांगले! त्या पंगतींचा थाट काही निराळाच! हसतखेळत, मौजमजा करत, आग्रह करत खाण्याची मजा औरच असते..! त्यांना थांबवत आकाशने विचारले, पण मामा,एवढ्या पंगती वाढणार कोण? तिथेच तर घोडे अडतेय ना. तुला सांगतो आकाश, आजही खेड्यात लग्न लागले ना, की पहिली पंगत पाच-सहा हजार लोकांची होते. शेवटच मंगलाष्टक होताच तेवढी माणसे खाली अंथरलेल्या सतरंज्या गोळा करून पटापट बसतात. पन्नास-साठ पोरांचा ताफा अगदी