मला काही सांगाचंय..... - ३९ - ३

  • 7.7k
  • 1
  • 2.4k

३९. सोबती - जुने कि नवे - 3 तिच्यासाठी एक छानपैकी ग्रिटींग आणि एक लाल गुलाब घेऊन , काय आणि कसं बोलावं याचा सराव करून कॉलेजला गेलो होतो , पण माझं दुर्दैव जास्तच जोरावर होतं , ती कॉलेजला आलीच नव्हती आणि त्यादिवशी एक नजर दिसली पण नव्हती ... मग काय निराश होऊन कबीर जवळ ते ग्रिटींग आणि गुलाबाचं फुल घेऊन नशिबाला दोष देत बसून राहिलो होतो , मनात एकाच वेळी कितीतरी भावना येत होत्या ... राग , दुःख , प्रेम ..! एक क्षण आला की डोळ्यात आसवांनी गर्दी केली , एक दोन थेंब खाली पडले , दुःखाचा ओघ सरला