३९. सोबती - जुने कि नवे - 1 ती विचार करत झपाझप पाच सहा पावलं टाकत किचनमध्ये शिरली . तिने फरशीवर पडलेला ग्लास उचलून ओट्यावर ठेवला , मांजर उपद्वाप करून कुठे लपली ते पाहायला लागली पण मांजर काही तिच्या नजरेस आली नाही ... तरी काहीतरी आवाज करून , कुठे कोपऱ्यात लपून बसली असेल तर पळून जाईल म्हणून तिने एक दोनदा हाकलून द्यायचं म्हणून प्रयत्न केला , जरावेळ हालचाल होते का ते पाहून तिने फ्रीज उघडला आणि थंडगार पाण्याची एक बॉटल बाहेर काढली ... दोन तीन घोट पाणी ती तिथंच प्यायली , मांजर बहुतेक निघून गेली असावी असा विचार करून