मला काही सांगाचंय..... - ३५

  • 7k
  • 1
  • 2.6k

३५. भाग्य सुजित बस स्थानक येथून दवाखान्यात परत आला तर आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज सुध्दा इतक्यातच तिथं पोहोचले होते . एकमेकांशी नजरानजर झाल्यावर सुजितला त्याच्यावरचा राग त्यांच्या डोळ्यात दिसून आला ... मग तो जवळ जाऊन ," दोस्तहो , मला माहित आहे तुम्हाला नक्कीच माझा राग आला असेल , पण खरंच माझा नाईलाज झाला होता असं नाही की मी विसरलो होतो , नाही मला तिला डायरीबद्दल विचारण्याचा मुळीच विसर पडला नव्हता , मी तिला एकांतात बसून व्यवस्थित विचारलं तर ती चुकून डायरी घरीच राहिली अस सांगत होती आणि तिला घरी जाणं खूप आवश्यक होतं म्हणून मी तिला थांबवू शकलो नाही