मला काही सांगाचंय..... - ३३ - १

  • 6.4k
  • 1
  • 2.6k

३३. आशा , निराशा कितीतरी वेळ ती तशीच खुर्चीत बसून होती ... मनात येणारे प्रश्न तिला आणखी जास्त त्रास देत होते ... डोकं शरीरापेक्षा जड झालं की काय असं तिला वाटून गेलं , तिच्या मनात सतत एकापाठोपाठ एक विचार येत होते ... असं स्वप्न का पडलं ? त्याचा नेमका काय अर्थ असावा ? कुमार ठीक तर असेल ना ? मला असं स्वप्न पडले नियतीचा काही संकेत तर नसावा...? अनेक प्रश्न तिच्या मनात घर करत होते , ती बेचैन झाली , शेवटी विचारांचं ते वादळ दूर करत ती बेडरुममध्ये गेली ... आत प्रवेश केला , तिची नजर डायरीवर स्थिरावली ... पण