मला काही सांगाचंय..... - ३२

  • 6.4k
  • 2.5k

३२. भेटीची ओढ इकडे कुमारच्या घरी ... ... ... नवीन ठिकाणी तशी उशिराच झोप येते तर याबरोबरच कुमार आणि त्याच्या कुटुंबियांवर हि वेळ आली होती त्यामुळे सर्वांनाच दुःख झालं होतं ... मग याप्रसंगी मन कश्यातच समाधानी नव्हतं तर झोप रोजच्यासारखी कुणालाच लागली नव्हती ... गावात कोंबडा आरवला कि सर्व लोक जागी होतात , तशी सर्वांना जाग आली ... सर्व उठून जागेवरच बसले ... बऱ्याच दिवसांनी नजरेसमोर त्यांनी जरा वेगळा आणि मनमोहक देखावा ते पाहिला ... तांबूस सूर्यकिरण नभनक्षी कामात बुडालेले , पाखरांची किलबिल सुरु झालेली , गुराढोरांना चारापाणी करून लोक कामात रमलेले , कुणी दुधाच्या धारा काढत असल्याचा