जुळले प्रेमाचे नाते - भाग-४५

(15)
  • 10.7k
  • 1
  • 4.4k

"मी सांगितल ना आता तू सांग बर..." आईने लगेच प्रश्न केला. हो नाही.. करत मी बोलु लागले.."अग आई.. ते म्हणजे... मला निशांत आवडतो. खरतर खूप आधीपासुन तो आवडू लागला होता. त्याने माझी काळजी घेणं.. त्याला माझ्या बद्दल सगळं नाहीत आहे .., मला काय आवडत.., काय नाही ते.. अग आई त्याने माझ्यासाठी सोडलेली, पाणीपुरी खायला सुरुवात केली.." "त्यात हर्षल ला ही तो आवडायचा.." आणि मी तिच्या बर्थडे ला झालेला प्रकार सांगितला. हे ऐकून तर आई थोडी शॉकमध्ये होती.. "त्यात आमच्या डान्स नंतर त्याने मला प्रपोज केलं. त्यात माझं ऍकसिडेंट झालं.. त्यानंतर त्याने माझ्यासाठी मंगळवारचे उपवास सुरू केले.. कधीही देवासमोर पाया न पडणारा आता