भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २९) अंतिम भाग

(25)
  • 5.3k
  • 1
  • 2.2k

रात्री आकाश कधी आला कळलं नाही. सई सकाळी जागी झाली तेव्हा नहमीपेक्षा जास्त काळोख होता. घड्याळात पाहिलं तिने. सकाळचे ८ वाजत होते. आकाश अजूनही tent मधेच होता. " आकाश !! आकाश !! " सईने त्याला बाहेरूनच आवाज दिला. सईचा ग्रुप बाहेर आलेला होता. आकाश आवाज ऐकून बाहेर आला. केस कापून , दाढी केलेला आकाश... वेगळाच भासत होता. "wow !! " त्यातली एक मुलगी पट्कन बोलली. सईसुद्धा बघत राहिली त्याच्याकडे. आकाश आला तिच्यासमोर... आणि टिचकी वाजवली. तेव्हा सई भानावर आली. " मी असाच दिसतो नॉर्मल.. " आकाश हसला. पण त्याचं ते हसू जास्त काळ टिकलं नाही. कारण पावसाचे मोठे मोठे ढग