निघाले सासुरा - 13

  • 6.5k
  • 2.7k

१३) निघाले सासुरा! छायाच्या लग्नाच्या कामांनी वेग घेतला होता. जो तो जमेल तसा आपला सहभाग नोंदवत एक-एक काम मागे टाकत असला तरीही ऐनवेळी एखादे नवीन काम समोर उभे टाकत होते. त्यादिवशी कोणत्या तरी विषयावर चर्चा रंगलेली असताना अचानक आकाशने विचारले,"आत्या, मला एक सांग लग्नाची वेळ झालेली असताना, सारे अक्षता टाकायला सज्ज असताना मंगलाष्टकं सुरू होण्यासाठी वेळ का लागतो ग?""त्याला काय एक कारण आहे का? आजच नाही, पूर्वीही असे प्रकार होत असायचे." बाई म्हणाली."पूर्वी म्हणे नवरदेव रुसत असे." अलकाने विचारले."ती फार मनोरंजक कारणे आहेत. कधी हुंडा जास्त मिळावा म्हणून तर कधी अंगठी, कपडे इतकेच काय पण पलंग मिळावा म्हणूनही नवरदेव