मला काही सांगाचंय..... ३१ - १

  • 6.7k
  • 1
  • 2.6k

३१. स्वप्न आणि सत्य ती काही वेळ तशीच बिछान्यावर डोळे मिटून होती .... तिच्या बंद पापण्यांच्या पडद्यावर तिला काही परिचित अपरिचित चित्र दिसू लागली ... ती फक्त विचाराधीन मनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करु लागली ... तिला एकवेळ नजरेसमोर दवाखान्यात पाहिलेला कुमार दिसला , तिने डोळे उघडले ... किंचित मान वर करून तिने हळूच बाजूला नजर फिरवली तर तो पलीकडे तोंड करून झोपलेला तिला दिसला , परत एकदा खात्री करून तिने डायरी हातात घेतली ... तीने पुढे वाचायला सुरुवात केली... कुमारने डायरीत समोर लिहिलं होतं ... तिचा वाढदिवस होऊन जवळपास एक आठवडा झाला होता पण तरीही केवळ बाहेरगावी