आज 400 वर्षानंतर हि ज्यांचे नाव ऐकल्यावर आपली छाती अभिमानाने फुलून येते ते म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांविषयी आजपर्यंत खूप मान्यवरांनी लिखाण केलं. आपापल्या परीने राजांच्या आयुष्याच्या घड्या उलघडण्याचा प्रयत्न केला. हे जरी सत्य असलं तरी सुर्यासारख्या तेजस्वी राजांना शब्धात मांडता येणं हे फारच कठीण आहे. त्यांच्या पराक्रमाला शोभेल आणि त्यांच्या सन्मानाला पेलता येईल अशी ताकत कोणत्याही भाषेच्या शब्धात सामावलेली नाही. छत्रपती शिवाजी राजांचे सबंध आयुष्य रयतेच्या सेवेसाठी गेले. रयतेच्या सुख दुःखांची खरी जाण त्यांना होती. त्यांच्या सारखा जाणता राजा या मराठी मुलखाला आणि मराठी रयतेला लाभला हे आपलं भाग्यच आहे. राजे होते म्हणून तर आज