तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ३

(46)
  • 31.6k
  • 23k

ती बाल्कनीतून एकटक बाहेर पाहत होती. खाली गार्डनमध्ये खेळणारी मुलं तिला नेहमीच सुखावत. सर्व झुडूपांवर उमललेली फुल आणि दुडूदुडू धावत खेळणारी मुल दोन्ही सारखीच. कधी कधी तीही त्यांच्यासोबत खेळायला जाई. त्याच्यात रमून जाताना आपला आयुष्यात काय चाललंय हे ती विसरून जाऊन पुन्हा लहान मूल होऊन जाई... काश माझं पण बाळ असेल अस.... नुसत्या कल्पनेनेच ती लाजली. तिच्या कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या. आपल्याच धुंदीत शरमुन तिने आपले डोळे बंद केले. तिला आपल्या डोळ्यांवर गरम श्वास जाणवले. लगोलग तिच्या माथ्याचे चुंबनही घेतले गेले. तिला आतून भरून आल. त्या ओल्या स्पर्शाने ती शहारली..... कसं कळत ह्याला माझ्या मनातलं... त्याच्या स्पर्श तिच्या अंगभर फिरत