एडिक्शन - 17

  • 5.8k
  • 3.1k

वरून जो नकार वाटत होता तो मुळात नकार नव्हताच ..तिने मला त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या अथांग प्रेमाचा त्याग केला होता ..त्यामुळे तिच्या शब्दांसमोर मी काहीच बोलू शकलो नाही परंतु मला विश्वास होता की तिचा नकार काही दिवसात होकारात बदलणारच आहे ..तिच्या प्रेमात तडफडणारा मी दिसतोय की बोलणं देणारा समाज यावरच आता आमचं भवितव्य अवलंबून होत ..त्यामुळे वाट पाहण्याशिवाय माझ्या हाती काहीच उरलं नव्हतं .. तिला मनातलं संगीतल्यापासून सर्व काही बदललं होत ..श्रेयसी जी मला रोज फोन करायची तिने आता फोन करनच सोडून दिलं होतं ..बहुतेक ती माझ्यात गुंतत जाईल आणि गुंतली की बाहेर निघता येणार नाही