जुळले प्रेमाचे नाते - भाग-४३

(17)
  • 10.6k
  • 4.4k

"अरे निशांत तु....???! कधी आलास...??." मी सोफ्यावर जाऊन बसतच विचारले.... तेव्हा कुठे त्याने स्वतःच तोंड त्या मोबाईलमधुन वर काढल आणि माझ्याकडे बघुन फक्त एक स्माईल दिली... त्याच्या त्या स्माईलच मला काही कळलंच नाही... "मी काय विचारल आणि याच काय चालू आहे..??" स्वतःशीच बोलत मी किचनमध्ये निघुन गेले.. "काय ग आई कधी आला हा खडूस..." मी फ्रीजमधुन पाण्याची बॉटल काढुन पाणी पित विचारले... "तु जेव्हा झोपा काढत होतीस तेव्हा आला.. तुझ्या रूमधे गेलेला पण तू झोपली होतीस म्हणून आला बाहेर आणि एकटाच बसला आहे कधीचा.." आई कपामध्ये चहा ओतत बोलली.. तशी माझ्या हातात पाण्याची बॉटल तशीच... आणि मला आठवल.., तो स्पर्श... ती किस