३०. नशीब नाईट लॅम्पचा मंद प्रकाश डायरीच्या पानांवर पडत होता , जरा नजर रूममध्ये इकडे तिकडे गेली की उजेड जणू नसल्याचं तिला भासत होतं ... पंख्याचा गार वारा , नीरव शांतता असल्याने फिरणाऱ्या पात्यांचा गरगर असा आवाज तिच्या सोबतीला होते आणि कुमारची डायरी ... मनात मध्येच येणारे काही विचार , आठवणी ... बिछान्यावर पूर्ण अंग टेकवून तिला बरं वाटलं ... मनात येणारे विचारांचे वावटळ दूर करून तिने वाचायला सुरुवात केली ... कुमारने समोर लिहिलं होतं --- तिची MS-CIT ची परीक्षा झाली , मला ठाऊक होतंच कि ती पास होणार अन ती चांगले टक्के घेऊन