प्रेम...?

  • 7.8k
  • 2.2k

सर्वांनाच नजरेची भाषा समजते असं नाही. प्रेमात संवाद हा महत्त्वाचा आणि प्रेमात संवाद झालाच नाही तर?.... शाम हा उत्साही, थोडासा स्वप्नाळू आणि बराचसा हळवा, नुकतीच दहावीची शाळा संपवून अकरावीत नविन शाळेत, नव्हे नविन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. नविन कॉलेज गावातून काही किलोमीटर अंतरावर असल्याने तो आणि त्याचे मित्र सायकलने जात. बाल्यावस्था संपून आयूष्यातील सूवर्णकाळ म्हणजे तारूण्यात प्रवेश केलेला.या वयात मन अनेक गोष्टींत गुंतत जातं.या वयात वाटणारं आकर्षण स्वाभाविक आहे.त्यात कुणी झाडावर चढवलं तर मग विचारायलाच नको. नविन कॉलेजचा पहिला दिवस मन पाखरासारखं भिरभिरायला लावणारा होता.नविन मित्र भेटत होते.नविन ओळखी होत होत्या.त्यात त्याला लहाणपणीची क्लासमेट प्रियांका कॉलेजमध्ये भेटली.नविन कॉलेज मध्ये ओळखीचं