भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २७)

  • 5.6k
  • 2.3k

खूप साऱ्या विनवण्या ... request करून अमोल पुन्हा पलीकडल्या तीरावर पोहोचला. परंतु आता नवीन प्रश्न.. या सर्वाना शोधायचं कुठे.... धावतच तो नदी पासून दूर आला आणि एक थंड हवेच्या झोताने शहारून गेला. मागे वळून पाहिलं त्याने. पाऊस भरून येतं होता. बापरे !! घाई करावी लागेल आता.. समोरच एक पायवाट दिसली... नक्की गावात जाईल हि वाट... अमोल तिचं वाट पकडून धावत गेला. पलीकडल्या तीरावर, सई सुद्धा आकाशने सांगितलेल्या गावात पोहोचली. एव्हाना वाऱ्याने चाहूल दिलेली... पाऊस येतं असल्याची. आकाशला लवकर शोधलं पाहिजे. गावात पोहोचली तर कोणालातरी विचारता येईल... सईच्या मनात चलबिचल. तरी एकाला विचारलं तिने .. " भटक्या ना... आज सकाळीच निघून