एडिक्शन - 16

  • 6.8k
  • 3.5k

गावावरून परत आल्यावर श्रेयसीच्या स्वभावात फार फरक जाणवला होता ..तिने बऱ्याच दिवसांनी भरलेलं कुटुंब पाहिल्याने ती त्यातच गुंतली होती ..इकडे ऑफिसच काम नियमित सुरू झालं होतं ..श्रेयसीला आधी जगण्याची इच्छा नव्हती पण आता तिला प्रत्येक क्षण जगावासा वाटत होता ..मी सावलीप्रमाणे तिच्यासोबत असायचो आणि ती माझ्या सोबत असायची .. ऑफिसच काम सुरू होऊन काही दिवस झालेच होते की एक खूषखबरी मिळाली ..निशाणे एका गोंडस बाळाला जन्म दिला होता ..सरांना जशी बातमी मिळाली तसच त्यांनी मला बोलवून घेतलं आणि आम्ही दोघेही हॉस्पिटलला पोहोचलो ..तिच्या कुटुंबातले सर्व लोक तिला येऊन भेटत होते आणि मी बाहेरून तिला पाहू लागलो ..योगेशच्या हातात