निघाले सासुरा - 11

  • 7.7k
  • 2.6k

११) निघाले सासुरा! एकेक दिवस मागे पडत होता. लग्नाचा दिवस जवळ येत होता. तसतशी लगीनघाई वाढत होती. त्यादिवशी जेवणे झाली आणि सारे जण दिवाणखान्यात बसले असताना बाई म्हणाली, अहो, आपण एक गोष्ट कशी विसरलो हो? कोणती? दामोदरपंतांनी विचारले. अहो, दयानंदाच्या मुलीचे लग्न ठरलंय. हो क्का? पण हे दयानंद कोण गं? कोणत्याही वेळी मस्करी करत जाऊ नका हो. अहो, आपणास केळवण करावे लागेल की. अरे, खरेच की. मीसुध्दा विसरलोच. पण त्यासाठी आपल्याला आपल्या घरी जावे लागेल. या सर्वांनी तिकडे यावे लागेल. वन्स, भाऊजी, ते काहीही नको. तुम्ही इथून गेलात म्हणजे संपलं सारं. सरस्वती म्हणाली. खरे आहे. अग बाई , केळवणाची काहीच गरज नाही. दयानंदा, तुमचे बरोबर आहे. पण सरस्वती