मला काही सांगाचंय.... - २९

  • 6.9k
  • 2.6k

२९. निमित्त तिने दार उघडले ... बाहेर येतेवेळी नाईट लॅम्प आणि पंखा बंद न केल्याने सुरूच होते ... ती दार मागे ढकलून बिछान्यावर बसली , डायरी अलगद उचलून हातात घेतली ... पुढे वाचायला सुरुवात करणार तोच मोबाईलचा टॉर्च सुरु असल्याचं तिला समजलं , आधी टॉर्च बंद करून स्वतःशीच ---' कुमारने आणखी काय लिहिलं ? ' अस पुटपुटत ती डायरी वाचायला लागली .... कुमारने लिहिलं होतं ..... .... .... तेव्हा माझ्यात एक बदल झालेला मला समजून आला होता तो म्हणजे तिला भेटायचं म्हणून मी कोणता ना कोणता बहाणा शोधायचो . मग काही वेळा मला निमित्त साधून तिला भेटता