जुळले प्रेमाचे नाते - भाग-४१

(16)
  • 10.5k
  • 2
  • 4.6k

पण यासर्वांत मी आणि निशांत बरेच जवळ आलो होतो.. आमच्यामधलं प्रेम आता नव्याने बहरत होत. एक्साम ही जवळ आल्या होत्या.. सगळं विसरून मी जोमाने अभ्यासाला लागले.. आजकाल मी आणि निशांत लायब्ररीत बसून अभ्यास करायचो.. त्यात राज असायचा, पण मधेच त्याला आठवण आली की त्याच्या भावनांचा बांध तुटे... अशाच एके दिवशी मी कॅन्टीनमध्ये बसले असता माझा मोबाईल वाजला.... कॉलवर राजचा नंबर झळकत होता. "हॅलो...,बोल ना राज" मी हातातलं काम करतच विचारले. "हॅलो मी राज नाही.., राजचा मित्र राहुल बोलतोय. तो क्लासरूम मध्ये चक्कर येऊन पडला आहे.. तु येतेस का जरा...??" एवढं बोलुन त्याने कॉल कट केला. मी माझ्या हातातलं सगळं कसतर बॅगमध्ये भरल