नेताजींचे सहवासात - 1

  • 10.1k
  • 4.5k

नेताजींचे सहवासात प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33 (1) कै. पुरुषोत्तम. ना. ओकांच्या ४ डिसेंबर (२००७) ला पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो. कै. काकांनी ह्या पुस्तकांतून त्यांच्या व नेताजींच्या सहवासात घडलेल्या घटना आणि त्यातून नेताजींच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातील मराठीबाजाने केलेल्या लिखाणात पुनांच्या वैशिष्ठ्य़पूर्ण लेखनपद्धतीचा व शब्दसंचयाचा परिचय मिळतो. त्याचा प्रत्यय म्हणजे पुस्तकाचे शीर्षकः नेताजीं'च्या' ऐवजी त्यानी 'चे' असा प्रत्यय लावला आहे.पुस्तकात एकंदर १२ प्रकरणे असून शेवटची दोन २००० सालच्या आवृतिच्या निमित्ताने भर घालून प्रकाशित झाली होती. माझ्या हातात या पुस्तकाची तिसऱ्या आवृत्तिची प्रत ऑक्टोबर २०१३ मधे