निघाले सासुरा - 10

(11)
  • 7.5k
  • 3k

१०) निघाले सासुरा! साखरपुड्याचा दिवस उजाडला. मागील काही दिवस भलतेच गडबडीत गेले होते. रविवारी सकाळी सकाळी लवकर उठून सारे पंचगिरी कुटुंबीय अकरा वाजण्याच्या सुमारास कुलकर्णींकडे पोहोचले. कुलकर्णी यांच्या घराची सजावट बघण्यासारखी होती. अल्पावधीतच भिंतींना रंग देऊन झाला होता. दारे-खिडक्यांचे पडदे बदलले होते. घरातील फर्निचर नवीन आणि आकर्षक स्वरुपाचे घेतले होते. घरामागे असलेल्या मोकळ्या जागेवर दोन खोल्यांचे बांधकाम चालू होते. पंचगिरी यांची निमंत्रित पाहुणे मंडळी दहाजण होती तर कुलकर्णी यांचेही पंधरा पाहुणे उपस्थित होते. एकदम सुटसुटीत, आटोपशीर असा कार्यक्रम हसत खेळत पार पडला. कुठेही घाई नाही, गडबड नाही. अगदी सारे कसे यथासांग झाले. एकंदरीत सारे हलकेफुलके वातावरण पाहून पंचगिरी यांच्यासोबत