सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा अधिकार याना कोणी दिला?आपल्या देशात कोणतीही घटना घडू द्या त्याचे रूपांतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात होते. दंगली करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा अधिकार या आंदोलन कर्त्याना कोणी दिला? वास्तविक त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्याकडून ही नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे. अगदी सामान्य घटना घडली तरी निषेध व दंगली याचे लोण वाऱ्यासारखे पसरते. राजकीय पक्ष व विविध संघटना याला कारणीभूत ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याच पक्षाला किंवा संघटनेला नावजायला नको. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे यात यांचा हातखंडा आहे. पक्ष संघटना यांचे नेते प्रत्येकवेळी बघ्याची भूमिका घेताना दिसतात. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करताना त्याची दृश्ये सीसीटीव्ही किंवा प्रसार माध्यमाकडे चित्रित झालेली