भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २४)

  • 5.5k
  • 2.3k

आकाश तर भलत्याच विचारात गढून गेलेला. त्यात सई त्याच्या मागे कधी येऊन उभी राहिली, हे त्याला कळलं नाही. " कॅमेरा कधी वापरला आहेस का... तू .. " आकाशने सई कडे पाहिलं. " नाही .... का ? " ," तुझ्या गळयात असतो ना... तो कोणाचा आहे मग... " , " सांगितलं ना आधीच... माझ्यासोबतच आहे आधीपासून.. पण आता का पुन्हा विचारते आहात .. " सईने वाचलं होते कुठेतरी. memory lose झालेल्या व्यक्तींना , त्याच्या आठवणीतील गोष्टी , रोजच्या वापरातील गोष्टी समोर आणल्या तर त्यांची गेलेली memory परत येते. आता भटक्या हाच आकाश असेल तर त्याची नित्याची गोष्ट म्हणजे... साहजिकच कॅमेरा ... म्हणून ती कॅमेरा