जुळले प्रेमाचे नाते - भाग-३९

(20)
  • 9.8k
  • 1
  • 4.3k

आज सकाळपासुन मी निशांतची वाट बघत होती. कारण तो घरी गेलेला फ्रेश होण्यासाठी. एकतर बिचारा रात्री माझ्यासाठी थांबत होता. बाबांना त्रास नको म्हणुन.. किती समजुदार आहे हा खडूस. माझ्यावर एवढं प्रेम करतो., माझी काळजी घेतो. माझ्या घरच्यांना, स्वतःच्या घरच्यांना किती सांभाळून घेतो. खडूसवर आता तर प्रेम अजूनच वाढत जात आहे. "पण राहिला कुठे हा मुलगा.." स्वतःशीच बडबड करत असताना आई आली. ती सकाळीच येऊन बसली होती. पण डॉक्टरने बोलावल असल्याने गेलेली बाहेर. तीच आली मला तर वाटलं निशांत असेल. "काय ग आई., काय बोलले डॉक्टर साहेब. अजुन किती दिवस मला ठेवुन घेणार आहेत." मी एक डोळा मारून हसुन विचारल. "अजून काही