जुळले प्रेमाचे नाते - भाग-३८

(21)
  • 10.2k
  • 4.5k

"ते बाकीच्यांसाठी होत, आता खर बोल माझ्याशी. सांग कशासाठी हे उपवास.. निशांत मला माहित आहे तुला भूक सहन होत नाही. मग हे कशाला करतो आहेस." मी काळजीपोटी त्याला विचारले असता. त्याने फक्त एक मोठी स्माईल दिली.. "वेडु तुझ्यासाठी करतो आहे." स्वतःचे डोळे बंद केले. एक दीर्घ श्वास घेतला आणि तो बोलु लागला.. "तुला माहीत आहे., त्यादिवशी तुला प्रपोज केलं आणि मी सरांनी बोलावल म्हणून गेलो. आणि जेव्हा परत आलो तर तू तिथे नव्हतीस.. मी पूर्ण कॅम्पसमध्ये शोधलं तुला.. पण तू कुठेच दिसत नव्हतीस. तेव्हा एका मित्राने सांगितलं की, कॉलेजसमोर एक ऍकसिडेंट झाला आहे... पळत बाहेर आलो आणि....." स्वतःचे डोळे पुसत तो