तोच चंद्रमा.. - 17

  • 5.2k
  • 1.8k

१७ जुळले सूर.. रस्ता आता सरळसोट दिसत होता. मी आणि ब्रुनी .. तिला ही मान्य आहे.. माझा तर प्रश्नच नाही .. घरून माझ्या तरी काहीच प्राॅब्लेम नाही. तिच्याकडे? देवास ठाऊक, पण कॅन बी मॅनेज्ड. आता फक्त तिला गिटारीवर तिच्यासाठी म्हणून खास गाणी वाजवून दाखवणे.. आणि हिंदीत म्हणतात ना तसे चुपकेसे तिच्या दिलमें उतरणे! म्हणजे आधीच उतरलोय पण अजून ठाण मांडून बसणे! म्हणजे मुक्काम ठोकणे! माझे काय.. ती आधीपासूनच बसलीय माझ्या दिलमें. शनिवार संध्याकाळ ही अजून एक आठवणीत राहिल अशी मंतरलेली संध्याकाळ असणार .. मी ती आणि माझ्या गिटारीचे सूर. त्यातून सारी प्रेमगीते ऐकवणार मी तिला.. मी