निघाले सासुरा - 8

  • 6.7k
  • 2.8k

८) निघाले सासुरा! 'आहेर द्यायचे आणि घ्यायचे!' सरस्वतीच्या हट्टापुढे सर्वांनी माघार घेतली. सर्वांनी एकत्र बसून पत्रिका, निमंत्रणं कुणाला द्यायची यासंदर्भात यादी तयार केली. ते काम अंतिम टप्प्यात असताना सरस्वती आकाशाला म्हणाली,"आकाश, त्या नमुन्याला... अरे, मला म्हणायचे होते, तुझ्या दिगुकाकांना फोन कर. पत्रिकांचे चांगले नमुने घेऊन ये म्हणावे..." सरस्वतीच्या स्पष्टीकरणानंतरही तिथे चांगलीच खसखस पिकलेली असताना छायाने एक पत्रिका सर्वांना दाखवली. तिने विचारले,"आई, आत्या, ही पत्रिका कशी वाटतेय..." तसे आकाश- अलकाने एकमेकांकडे सहेतुक पाहिले."व्वा! व्वा! छान! सुरेख! अशी पत्रिका मी तर प्रथमच पाहतोय." दामोदर म्हणाले."अग, पण फार भारीची वाटतेय ग." सरस्वती म्हणाली."आई, आपल्या लाडक्या छायाताईचे लग्न म्हटल्यावर असं हजार-पाचशे रुपयाकडे पाहून