प्रेमा तुझा रंग कोणता.. - ५ - अंतिम भाग

(53)
  • 12.1k
  • 1
  • 5k

प्रेमा तुझा रंग कोणता..-५ गिरीजा सगळ सामान घेऊन थेट आईकडे गेली..तिनी तिच्या घरची बेल दाबली..दार आईनी उघडल..गिरीजा सामान घेऊन आलेली पाहून आई बुचकळ्यात पडली.. “आई...बाजूला हो... मला सामान ठेऊ दे माझ्या रूम मध्ये..” “काय झाल गिरीजा...एकदम सामान घेऊन का आलीस?” आश्यर्यचकित होऊन गिरीजच्या आईनी गिरिजाला प्रश्न केला.. “नंतर सांगते ग आई.. आधी मला जाऊदे माझ्या रुममध्ये... आणि जरा वेळ प्लीज डिस्टर्ब करू नकोस..मला कादंबरी लिहायला चालू करायचीये.. एका महिन्यात प्रकाशित करायची आहे..” “ठीके..बोलू नंतर...आणि लिही शांतपणे कादंबरी..” गिरीजा तिच्या रूम मध्ये गेली आणि दार लाऊन लिहायला लागली... तिनी कॉम्पुटर लावला आणि तिनी लिहायला चालू