जुळले प्रेमाचे नाते - भाग-३७

(24)
  • 10.4k
  • 1
  • 4.5k

आज सकाळीच मला लवकर जाग आली. उठुन बसायचा प्रयत्न केला तर काही जमत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं तर कोणी नव्हतं. मग तशीच पडून राहिले. काही वेळाने एक नर्स आली आणि तिच्या मदतीने तिने मला बेडला टेकून बसवले.... "काही हवं आहे का तुम्हाला.??" एक गोड स्माईल देत तिने माझ्याकडे पाहिलं. "मला जरा आरसा देता का तुम्ही..?? मला स्वतःचा चेहरा बघायचा आहे." माझं बोलण ऐकून ती "आणते हा" एवढं बोलून रूमबाहेर गेली.सोबत आली तेव्हा एका हातात नाश्ता आणि एका हातात आरसा. तो आरसा त्यांनी माझ्याकडे दिला. मी रोजच्या सारख म्हणून स्वतःला आरशात आणि......... हातातला आरसा कधीच खाली पडला होता. तोंडातुन शब्द फुटत नव्हते. दरवाजा