थोडेच चालले असतील. सुप्रीचं लक्ष सहज वर आभाळात गेलं. वादळ येते आहे. सुप्रीच्या मनात आलं लगेच. त्यात नदीला पूर येण्याची शक्यता तिने मघाशीच सांगितली होती. " कोमल !! आता आपल्याला पटापट चालावे लागेल. पाऊस येतो आहे मोठा.. आणि जमलं तर एखाद्या उंच ठिकाणी जावे लागेल.. " सुप्रीने आता पर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. म्हणूनच कोमलने सुप्री बोलल्याप्रमाणे करायचं ठरवलं. आकाशचा अंदाज बरोबर होता. तिथून पुढे एका डोंगरवजा ठिकाणी चढाई केली त्यांनी. विजेचा अस्पष्ट आवाज आला. आकाशचे लक्ष वेधलं त्याने. " बोललो होतो ना.. या गावातल्या लोकांचं कधीच चुकत नाही. " सर्व जण