तोच चंद्रमा.. - 16

  • 5.4k
  • 1.9k

१६ पुन्हा पुन्हा ब्रुनी! आता गोष्ट बरीच पुढे सरकली होती. विशेषतः ब्रुनी घरी आली न आमचे जे नेत्रकटाक्ष एक्सचेंज झाले त्यामुळे तर आम्ही अजून जवळ आल्यासारखे मनातून वाटत होते मला, काहीही न बोलता. तिलाही ते तसे वाटले हे मला नंतर कळाले. म्हणजे राॅबिन म्हणतो तशी आग दोन्ही बाजूंनी लागलीय तर.. ब्रुनी अाणि ते टायटॅनियन्स निघून गेले त्या दिवशी. पुढे दोन तीन दिवस असेच गेले. ब्रुनी बिझी असावी. मला पण अाॅफिसच्या रूक्ष हिशेबांत हे दिलाचे हिशेब मांडायला वेळ नाही मिळाला. मग एके दिवशी दुपारी वेळ मिळाला मला. आजवर ब्रुनीच इकडे येत होती मला भेटायला. आता माझी पाळी ..