तृष्णा - अजूनही अतृप्त - भाग १

(54)
  • 70.4k
  • 6
  • 51.3k

सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. अस बावनकशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मऊशार नितळ गोऱ्या कायेवरून व घाटदार वळणावरून तिच्या सर्वांगाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तीच अंग अंग रोमांचित होत होत. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शहारत होत. तिच्या ओलसर फेसाळल्या केसातून