प्रितिलता - एक परिसस्पर्श - 2

  • 10.2k
  • 3.3k

भाग-I पासून पुढे..."चल, तिला येवढं काय झालंय माझ्या पोराला येवढं मारोस्तवर", असे म्हणून रागात तावा- तावानं शामची आई शंकरच्या घरी आईजवळ आली आणि म्हणाली,"चल गं कमळे ,त्या मास्तरणीचं एवढं काय बिनसलंय बघू चल."शामची आई शंकरच्या आईला जशीच्या तशी घेऊन शाळेकडे निघाली.शाम रस्त्याकडेला बसला होता.शामच्या आईने शामला उठून पोटाशी कवटाळले.रडूनरडून सुकलेल्या तोंडावरून हात फिरवला आणि शाम, शंकर आणि शंकरची आई शाळेकडे चालू लागल्या.शाळेसमोर येऊन एका मुलीला शामची आई बोलली,"कुठाय मास्तरीन?,बोलव तिला.पोराला येवढं मारत्या,काय झालंय तिला"इतक्यात वर्गातून खबाले बाई आल्या.बाईंचा स्वभाव शांत आणि प्रेमळ होता.बाई दिसताच शामची आई," ये हिकडं.तुच का ती मास्तरीन, काय झालंय गं तुला, पोराला येवढं मारत्यास?तुझी साडीच फिडती,ये."बाई घाबरुन