भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १९)

  • 5.4k
  • 2
  • 2.3k

सई आकाशकडे पाहत होती. किती रमला होता तो त्या मुलांमध्ये. किती गूढ माणूस आहे हा... स्वतःच अस्तित्व माहित नाही.. तरी किती आनंदात, स्वतः पेक्षा दुसऱ्याचं सुख बघणारा... असा पहिलाच व्यक्ती बघितला मी. त्या बाई बोलल्या ते अगदी बरोबर, पाऊसच आहे हा... सतत भटकत राहायचे.. वाऱ्यावर स्वार होऊन... वाट मिळेल तिथे. वारा नेईल जिथे.... कोणताही अटकाव नाही, बंधन नाही.. फक्त भटकत राहायचे आणि बरसत रहायचे. सईच्या मनात काही जाणवू लागलं होतं आकाश बद्दल. ================================================== " तुमच्या दोघांचे कधीपासून relation आहे रे .. ? " सुप्री खोटा राग चेहऱ्यावर आणत विचारत होती. आकाश बुचकुळ्यात पडला.