जुळले प्रेमाचे नाते - भाग-३५

(19)
  • 10.9k
  • 1
  • 4.7k

माझ्या या वाक्यावर तर दोघी चांगल्याच उडाल्या. अभि शांतपणे ऐकत होती.. "अग, काय हे... नुसता मूर्खपणा आहे. हे अस वागून त्या मूर्ख, मंद मुलीला तीच प्रेम मिळालं असत का.??" वृंदा रागावतच बोलली. "ती हर्षु अक्कल शून्य गाढव आहे का?? आणि नंतर काय झालं म्हणजे.. आणि तुला जास्त काही झालं नाही ना ग..???" प्रियांकाने काळजी पोटी विचारले असता. मी फक्त हसुन मानेनेच नकार दिला. पण या सर्वांत अभि जरा शांत बघून प्रियाच बोलली.... "अग., अभि तु काहीच नाही का ग बोलणार.???" तिने आश्चर्याने पाहिलं अभिकडे. "माहीत होतं मला.." अभि शांतपणे बोलली. तस दोघीही ओरडल्याच.. "तुला माहित होत.??? आम्हला सांगावसं नाही का वाटलं