२५. सोनेरी क्षण रूमचा दरवाजा उघडून ते शिरले ... समोर बेडवर कुमार , त्यांना आत येतांनी बघून त्याने जरा मान वळून पाहिलं ... त्याला त्रास होऊ लागला तशी त्याने मान परत सरळ केली ... नजर रोखून तो त्यांना पाहू लागला , त्याची आई जवळ आली, त्याला त्या अवस्थेत पाहून तिला काय वाटतं होतं याची कल्पना कुणालाच करता येणं जवळ जवळ अशक्य ..! तिने खूप धीराने पापणीवरचे आसवं खाली गळण्याआधी पटकन पदराने टिपले ... त्याच्या बेडजवळच दोन लहान लहान स्टूल ठेवलेले होते , ती मात्र त्याच्याजवळ बेडवर बसली ... त्याच्या हाताला स्पर्श करून त्याच्या पूर्णतः उतरलेला चेहरा पाहून - " कुमार