निघाले सासुरा - 4

  • 11.6k
  • 5.2k

४) निघाले सासुरा! पंचगिरी यांच्याकडे बसलेल्या देशपांडेंनी चहाचा आस्वाद घेत कुलकर्णी यांना फोन लावला. ते फोनवर म्हणाले,"कुलकर्णीसाहेब, नमस्कार. तुम्ही धर्मसंकटात टाकले हो.""तसे काही नाही हो. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहोत.""तुम्ही दोघेही माझ्या शब्दाबाहेर नाहीत हे मी जाणतो पण हीच परिस्थिती धर्मसंकट निर्माण करते. तुम्ही काही तरी नाव ठेवले ना तर सर्वांनाच एक दिशा मिळाली असती.""देशपांडेजी, मला वाटते तुमची तिकडे चर्चा झालीय. तेव्हा...""कुलकर्णी, तुम्ही आणि पंचगिरी दोघांनी मिळून मला ...""तसे काही नाही. तुम्ही मोकळेपणाने बोला.""ठीक आहे. एक गोष्ट निःसंकोचपणे सांगा, की तुम्हाला हुंडा कोणत्या स्वरूपात हवा आहे?म्हणजे एकरकमी की सोने, कपडा अशा वेगवेगळ्या स्वरूपात चालेल?" देशपांड्यांनी विचारले"त्यांची कोणती इच्छा आहे?"