तोच चंद्रमा.. - 14

  • 4.9k
  • 1.8k

१४ नॅचरल गार्डन मध्ये दोनचार दिवस गेले असावेत. मध्ये वाटले की ब्रुनी येईल कधी, तर नाही आली ती. तिचे आॅफिस कुठेय ठाऊक नव्हते मला. नि असते तरी मी गेलो असतो की नाही कुणास ठाऊक. अशा बाबतीत पुढाकार घ्यायचा स्वभावच नाही माझा. त्यामुळे मी बदललो कितीही तरी किती बदलणार होतो? आॅफिसच्या कामांना अंत नव्हता हे खरे. बिल्डरचे आॅफिस, त्यात बिझी प्रोजेक्ट्स. हिशेब असणारच मोठमोठे. त्यात ब्रुनीची आठवण आली तरी वेळ कुठला मिळायला. असाच कंटाळून बसलेला असताना अशातच मला रघुवीरचा फोन आला.. "कसं काय? अॅडजस्टिंग वेल?" "हुं." "काय गप्प एकदम .." "गप्प नाही, थोडा कामात बिझी.." "ओके शुड आय काॅल