एका बोक्याची प्रेमकथा

  • 7k
  • 1
  • 1.4k

प्रस्तावना : डॉली माझी लाडकी मांजर. ही कथा तिच्या आठवणीत.. तिला समर्पित.. एका बोक्याच्याच शब्दांत.. प्रेम तसं तुमचं आमचं सेमचं असतं.. किंबहुना आम्ही तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढंच असतो.. का म्हणून विचारू नका.. मुळात आम्हाला दोन पाय जास्त असतात.. बसंती वार्‍यातल्या झुळक्याप्रमाणं तिची झुपकेदार शेपटी माझ्या तोंडावर मऊ चाबकासारखी पडली. आस्स्... डोळं उघडंस्तोर जीभेवर आलेली शिवी.. डोळं खुललं आणि ती शिवी घश्यातंच अडकली.. अहाहा... काय रूपडं तिचं.. जसं रंगपंचमीत तिच्यावरंच कुणीतरी परमनंट रंग टाकलेला.